‘राहुल गांधी तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर….’, स्मृती इराणी यांनी दिलं थेट खुलं चॅलेंज

‘राहुल गांधी तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर….’, स्मृती इराणी यांनी दिलं थेट खुलं चॅलेंज

| Updated on: Aug 09, 2023 | 2:46 PM

VIDEO | काश्मीर पंडितांवर झालेल्या अत्याचाराचा उल्लेख करत स्मृती इराणी सभागृहात आक्रमक, बघा काय केलं भाष्य?

नवी दिल्ली, ९ ऑगस्ट २०२३ | काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत भाग घेतला. यावेळी त्यांनी भाजपवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. खासकरून मणिपूरच्या हिंसेच्या मुद्द्यावरून त्यांनी भाजप सरकारला घेरल्याचे पाहायला मिळाले. यावर प्रत्युत्तर देताना भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी स्मृती ईराणी यांनी मणिपूरमध्ये घडलेली घडना, काश्मीर पंडितांवर झालेल्या अत्याचाराचा उल्लेख केला. काश्मीरच्या मुद्द्यावर बोलत असताना त्या म्हणाल्या, “तुमच्या सहकारी पक्षाचा नेता तामिळनाडूत काय म्हणाला? भारताचा अर्थ फक्त उत्तर भारत होतो. राहुल गांधी यांच्यामध्ये हिम्मत असेल, तर तुम्ही तुमचा सहकारी डीएमकेच म्हणणं खोडून दाखवा. काश्मीरला भारतापासून वेगळ केलं पाहिजे असं जो काँग्रेस नेता म्हणतो, त्यावर तुम्ही का बोलत नाही?”, असे म्हणत सभागृहातच खुलं चॅलेंज राहुल गांधींना दिलं

Published on: Aug 09, 2023 02:46 PM