तर देवेंद्र फडणवीस यांना घेराव घालू, या माजी खासदाराने दिला गंभीर इशारा
गृह खात्याकडून जबरदस्तीने ऊस तोडी सुरू आहेत त्याला आम्ही विरोध करणारच. 17 तारखेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापुरात येत आहेत. यावेळी त्यांच्याशी चर्चा करणार नाही तर त्यांना जाब विचारणार आहे.
कोल्हापूर | 15 नोव्हेंबर 2023 : राज्यामध्ये ऊस दराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. साखर कारखानदारांना ऊस आणण्यासाठी पोलीस प्रोटेक्शन दिले जात आहे. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर कोठे गुन्हे दाखल करत आहेत. पोलिसांवर दबाव कोणाचा आहे हे राज्य सरकारने स्पष्ट करावे. याचे उत्तर देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी द्यावे. जर हे उत्तर दिले नाही तर हा सगळा संशय गृहमंत्र्यांवर जातो असा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. ऊस उत्पादक आणि कारखानदारांमध्ये संघर्षाला सरकार जबाबदार असेल असा इशाराही त्यांनी दिला. सरकार कारखानदारांचा बटीक झालंय अशी टीकाही त्यांनी केली.
Published on: Nov 15, 2023 11:54 PM
Latest Videos

चोरीला गेलेलं बाळ सुखरूप आईच्या कुशीत, पोलिसांकडून 48 तासात शोध अन्...

युद्धाची पूर्व तयारी, गृहमंत्रालयाचे सर्व राज्यांना आदेश; 7 मे रोजी...

पाक पंतप्रधान गायब, पत्रकाराचा सवाल अन् उपपंतप्रधानांचं उत्तर बघा काय

मुंबईकरांनो... तुम्ही बेस्ट बसने प्रवास करतात? तुमच्यासाठी मोठी बातमी
