पुणे अपघात अन् आरोप थेट पवारांपर्यंत, दादांचा फोन जप्त करून त्यांच्या नार्को टेस्टची होतेय मागणी
ससून रूग्णालयातील दोन डॉक्टरांना आतापर्यंत अटक झाली. मात्र यानंतर आता अजित पवार यांच्या नार्को टेस्टची मागणी होत आहे. आरोपीला मदत केल्याच्या आरोप करत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवार यांचा फोन जप्त करून त्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली
पुणे कार अपघात प्रकरणावरून पोलीस अधिकारी निलंबित झालेत. ससून रूग्णालयातील दोन डॉक्टरांना आतापर्यंत अटक झाली. मात्र यानंतर आता अजित पवार यांच्या नार्को टेस्टची मागणी होत आहे. आरोपीला मदत केल्याच्या आरोप करत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवार यांचा फोन जप्त करून त्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली. नार्को टेस्ट म्हणजे सत्य जाणून घेण्यासाठी ही टेस्ट केली जाते. फॉरेन्सिक तज्ञ, तपास अधिकारी, डॉक्टरांच्या उपस्थितीत एखाद्या व्यक्तीची ही टेस्ट केली जाते. नार्को टेस्टमध्ये सोडियम पेंटोथॉल नवाचं इंजेक्शन दिले जाते. नार्को टेस्टमध्ये व्यक्ती न पूर्णपणे शुद्धीत असतो न बेशुद्ध असतो. व्यक्तीची विचार करण्याची क्षमता कमी होते, तो खरं बोलायला लागतो असं समजलं जातं. पण अशी कुणाचीही नार्को टेस्ट करता येत नाही. त्यासाठी कोर्टाची परवानगी लागते.