ईडीने आधी हे स्पष्ट करावं, अंजली दमानिया यांची छगन भुजबळ यांच्या प्रकरणावर मोठी मागणी
मंत्री छगन भुजबळ यांच्यावर अंजली दमानिया यांनी पुन्हा हल्लाबोल केला आहे. ईडीने जी याचिका दाखल केली होती. ती याचिका मागे घेण्यात आली यावर बोलताना दमानिया म्हणाल्या, ही बातमी मुळात चुकीची आहे. ईडीने कोणती याचिका मागे घेतली याबाबत लोकांना माहिती देण्याची गरज आहे
मुंबई, १२ डिसेंबर २०२३ : मंत्री छगन भुजबळ यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुन्हा हल्लाबोल केला आहे. ईडीने जी याचिका दाखल केली होती. ती याचिका मागे घेण्यात आली यावर बोलताना दमानिया म्हणाल्या, ही बातमी मुळात चुकीची आहे. ईडीने कोणती याचिका मागे घेतली याबाबत लोकांना माहिती देण्याची गरज आहे. भुजबळांविरोधात अनेक केसेस आहेत. यामध्ये ईडीने छगन भुजबळांना परदेशी जाण्यात मनाई करण्यात यावी, यासंदर्भातील 2018 मध्ये याचिका दाखल केली होती. त्यानंतर देखील भुजबळ स्वतः परदेशात अनेकवेळा जाऊन आले आहेत, असे कोर्टाचे म्हणणं आहे, असे अंजली दमानिया यांनी माहिती दिली. तर ईडीने आर्थिक घोटाळा संदर्भातील कोणतीही केस मागे घेतलेली नाही. कालच सुनावणी झाली आणि जे साक्षीदार होते त्यांचं म्हणणं विस्तृतपणे नोंदवून घ्यावं, असं न्यायालयाने सांगितलं आहे. तर माझा लढा त्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आहे आणि तो तसा सुरू राहील मरेपर्यंत मी त्यांच्याविरोधात लढेल, असा निर्धारच अंजली दमानिया यांनी व्यक्त केला.