Pandharpur Breaking | पंढरपुरात आषाढी वारी दरम्यान संचारबंदी लागणार? पोलिसांचा जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव

Pandharpur Breaking | पंढरपुरात आषाढी वारी दरम्यान संचारबंदी लागणार? पोलिसांचा जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव

| Updated on: Jun 22, 2021 | 4:30 PM

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं यंदा मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आषाढी वारी पार पाडण्याचा निर्णय़ घेतला आहे. मानाच्या दहा पालख्या एसटीद्वारे पंढरपूरला नेण्यात येणार आहेत.

पंढरपूर: कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं यंदा मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आषाढी वारी पार पाडण्याचा निर्णय़ घेतला आहे. मानाच्या दहा पालख्या एसटीद्वारे पंढरपूरला नेण्यात येणार आहेत. आषाढी वारीच्या दरम्यानच्या काळात पंढरपुरात संचार बंदी लागू करण्यात येईल, अशी शक्यता आहे. 17 जुलै पासून 25 जुलै पर्यंत संचारबंदी लावण्याबाबत पोलीस प्रशासनानं सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव सादर केला आहे. जिल्हाधिकारी या बाबत अंतिम निर्णय घेणार आहेत.कोरोना चा संसर्ग असताना कमी वारकरी घेऊन वारी करा असा सरकार चा आग्रह असताना, आळंदी संस्थान ने प्रस्थान सोहळ्याला ही १०० पेक्षा अधिक लोकांना परवानगी देण्याची मागणी केली आहे.