सोलापुरातील शिवजन्मोत्सव सोहळा; हजारो शिवभक्तींची मानवंदना; ड्रोनच्या नजरेतून पाहा शिवजयंतीचा उत्साह
सोलापुरातील शिवरायांच्या जन्मोत्सव पाळणा सोहळा पाहण्यासाठी हजारो शिवभक्तांनी गर्दी केली होती. या शिवभक्तांनी छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली. ड्रोन सौजन्य- प्रवीण गायकवाड. पाहा...
सोलापूर : सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नयनरम्य पाळणा सोहळा मध्यरात्री पार पडला. शिवरायांचा जन्मोत्सव पाळणा सोहळा पाहण्यासाठी हजारो शिवभक्तांनी गर्दी केली होती. या शिवभक्तांनी छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली. सोलापुरात दुसऱ्यांदा अशा प्रकारच्या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यापूर्वी 2020 मध्ये असा कार्यक्रम झाला. त्यानंतर कोरोनामुळे दोन वर्ष जयंती उत्सव झाला नव्हता.दोन वर्षानंतर शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळातर्फे यावर्षी पुन्हा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. डोळ्याचं पारणं फेडणारी दृष्य यावेळी शिवभक्तांना अनुभवता आली. हा सोहळा प्रवीण गायकवाड यांनी आपल्या ड्रोन कॅमेराद्वारे टिपला आहे. पाहा…
ड्रोन सौजन्य- प्रवीण गायकवाड
Published on: Feb 19, 2023 12:47 PM
Latest Videos