सोलापूर लोकसभेवर सुशील कुमार शिंदेंऐवजी प्रणिती शिंदे लढणार? वडिलांकडून मुलीसाठी जोरदार लॉबिंग!
tv9 special Report | सोलापुरातून महत्त्वाची बातमी... सोलापूर लोकसभेसाठी काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांच्याऐवजी प्रणिती शिंदे लढणार?; तिकीटासाठी सोनियां गांधी यांच्याशी सुशील कुमार शिंदे बोलणार?
मुंबई, १९ सप्टेंबर २०२३ | सोलापूर लोकसभेसाठी सुशील कुमार शिंदे यांनी, मुलगी प्रणिती शिंदे यांच्यासाठी लॉबिंग सुरु केलीय. प्रणिती, योग्य उमेदवार आहेत. तिकीट देण्यासाठी हायकमांडशी बोलणार असल्याचे सुशील कुमार शिंदे यांनी म्हटले आहे.सोलापुरातून मुलगी प्रणिती शिंदेंना लोकसभेचं तिकीट मिळवून देण्यासाठी सुशील कुमार शिंदेंनी कंबर कसलीय. प्रणिती शिंदे सोलापुरात लोकसभेसाठी योग्य उमेदवार आहेत आणि हायकमांडशी बोलणार असं सुशील कुमार म्हणालेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघ आघाडीतही काँग्रेसकडेच होता. 2014 मध्ये केंद्रीय गृहमंत्री असताना सुशील कुमार शिंदे पराभूत झाले होते. दरम्यान, आता मुलगी, आमदार प्रणितीसाठी वडील सुशील कुमार शिंदेंनी लॉबिंग सुरु केली. याआधीही प्रणिती शिंदेंनाही लोकसभा लढणार का? असा सवाल विचारला होता. बघा त्या काय म्हणाल्या..?
Published on: Sep 19, 2023 11:34 PM
Latest Videos