Jaykumar Gore : आमदार झालो अन् तिसऱ्या दिवशी माझ्यावर खुनाचा गुन्हा… जयकुमार गोरेंनी जाहीरपणे सांगितली 2009 मधील ‘ती’ घटना
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पंढरपूर माळशिरसमधील एका सभेतून विरोधकांना खडेबोल सुनावले. यावेळी जयकुमार गोरे यांनी बारामतीकांसह विरोधकांवर हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले.
‘जे पाकिस्तानात कधी घडणार नाही ते माझ्याबाबतीत घडलं’, असं मंत्री जयकुमार गोरे यांनी म्हटलंय. इतकंच नाहीतर आमदार म्हणून निवडून आलो आणि गुन्हा दाखल झाला असल्याचेही मंत्री जयकुमार गोरे म्हणाले. बारामतीच्या परवानगीशिवाय सूर्य मावळत नव्हता तेव्हापासून संघर्ष सुरू असल्याचे मंत्री जयकुमार गोरे यांनी एका जाहीर कार्यक्रमात यांनी सांगितले. पंढरपुरातील एका कार्यक्रमात बोलताना मंत्री जयकुमार गोरे यांनी २००९ सालचा एक किस्सा देखील सांगितला. सरकार यांचे, पोलीस यांचे तरी माझ्याविरोधात उभा असणाऱ्यांचा खुनाचा प्रयत्न मी पोलिसांकडून सुपारी घेऊन केला, असा गंभीर आरोप करण्यात आल्याचे जयकुमार गोरे यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, सरकार यांचे, पोलीस यांचे आणि तरीही त्याच पोलिसांना मी सुपारी देतो, अशा पद्धतीचे प्रयत्न करण्यात आले. तर जे पाकिस्तानात सुद्धा कधी घडणार नाही ते माझ्या बाबतीत यांनी करून दाखवले, असे म्हणत जयकुमार गोरेंनी बारामतीकरांवर हल्लाबोल केला.

रविवारी लोकलने प्रवास करताय? 'या' स्थानकांवर रेल्वे सेवा नसणार

मोदी आणि शहांना इंग्रजी येत नाही, म्हणून.. ; संजय राऊतांचा थेट आरोप

विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला

शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं
