रंग बरसे! म्हणत साठी पार तरूणांची आयुष्याची संध्याकाळ आनंदी; पाहा व्हीडिओ…
Solapur Rangpanchami : सोलापूरमध्ये वयाची साठी पार केलेल्या मात्र मनाने तरुण असलेल्या हरिभाई देवकरण शाळेतील माजी विद्यार्थ्याकडून रंगपंचमी साजरी केली जातेय. पाहा व्हीडिओ...
सोलापूर : सोलापूरमध्ये वयाची साठी पार केलेल्या मात्र मनाने तरुण असलेल्या हरिभाई देवकरण शाळेतील माजी विद्यार्थ्यांकडून रंगपंचमी साजरी केली जातेय. आम्ही वयाची साठी पार केली आहे. मात्र मनाने आम्ही अजूनही ठणठणीत आहोत आणि आम्ही दर रविवारी भेटतो. आज रंगपंचमी असल्याने एकत्रित होळी आणि रंगपंचमी साजरी केली. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, मुंबई, पुणे यासह राज्याच्या विविध भागातून आज आम्ही इथे रंगपंचमी साजरी करण्यासाठी आलोय. हरिभाई देवकरण शाळेतील दहावीच्या 1978 च्या बॅचचे सर्व विद्यार्थी एकत्रित जमलो आहोत, असं रंगपंचमी खेळण्यासाठी जमलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी म्हटलं आहे. आमचं तरुणांना एकच सांगणं आहे की, मोबाईलमधून बाहेर पडा आणि मैदानावर येऊन आपले सण-उत्सव साजरे करा. आगामी काळात जास्तीत जास्त होळी रंगपंचमी साजरी करण्याचा आम्ही संकल्प करतो, असंही ते म्हणाले.
Published on: Mar 12, 2023 02:39 PM
Latest Videos