सोलापुरच्या उजनी धरणाच्या कुशीत स्ट्रॉबेरी लागवडीचा यशस्वी प्रयोग

सोलापुरच्या उजनी धरणाच्या कुशीत स्ट्रॉबेरी लागवडीचा यशस्वी प्रयोग

| Updated on: Apr 04, 2023 | 3:03 PM

VIDEO | सोलापुरच्या करमाळ्यात शेतकरी विकास वाघमोडे यांनी घेतले सात गुंठे क्षेत्रात पाच लाख रुपयांचे घेतले उत्पन्न

सोलापूर : करमाळा तालुक्यातील विकास वाघमोडे या शेतकऱ्याने स्ट्रॉबेरी शेतीचा यशस्वी केला आहे. त्यांना केवळ सात गुंठे क्षेत्रावर पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. स्ट्रॉबेरी म्हटले की आपल्यासमोर उभा राहतो तो सातारा जिल्हा अन महाबळेश्वर परिसर. स्ट्रॉबेरीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेणारा म्हणून हा भाग ओळखला जातो. सोलापूर जिल्हयातील हवामान स्ट्रॉबेरीसाठी प्रतिकूल असल्याने येथे स्ट्रॉबेरीचे उत्पादन होऊ शकणार नाही असा समज होता. परंतु हा निष्कर्ष चुकीचा ठरवत करमाळा तालुक्यातील वांगी नंबर 3 येथील विकास वाघमोडे या शेतकऱ्याने स्ट्रॉबेरी शेतीचे चॅलेंज स्वीकारत ही शेती यशस्वी केली. सात गुंठे क्षेत्रात 4000 हजार रोपांची लागवड केली होती. यासाठी 1 लाख 13 हजार रुपये खर्च झाला होता. तर त्यातून त्यांना पाच लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे.

Published on: Apr 04, 2023 03:03 PM