Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : सोलापूरमधील रबरच्या फॅक्ट्रीला भीषण आग; आजूबाजूचे 3 कारखाने जळून खाक

Video : सोलापूरमधील रबरच्या फॅक्ट्रीला भीषण आग; आजूबाजूचे 3 कारखाने जळून खाक

| Updated on: Feb 15, 2023 | 9:18 AM

सोलापूरमधील अक्कलकोट रोडवरच्या एमआयडीसीतील रबर फॅक्टरीला भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये रबर फॅक्टरी पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

सोलापूर : सोलापूरमधील अक्कलकोट रोडवरच्या एमआयडीसीतील रबर फॅक्टरीला भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये रबर फॅक्टरी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. ‘गुजरात रबर फॅक्टरी’ असं या आग लागलेल्या फॅक्टरीचं नाव आहे. या रबर फॅक्टरीला लागलेल्या आगीमुळे आसपासचे दोन ते तीन कारखानेही आगीच्या भक्षस्थानी पडले आहेत. या आगीत कारखान्यातील संपूर्ण माल जळून खाक झाला आहे. मात्र जीवितहानी झालेली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.या कारखान्याच्या आसपासच्या दोन ते तीन फॅक्ट्रीरीही जळून खाक झाल्या आहेत. मध्यरात्री 3 वाजताच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Published on: Feb 15, 2023 09:18 AM