उकळते तेल टाकून पत्नीले पतीला संपवलं, चार दिवसांत झाला घटनेचा उलगडा
उकळतं तेल अंगावर टाकून शेतकऱ्याचा खून केल्याची घटना माढा तालुक्यातील सापटणे गावात घडली होती. मात्र या हत्याकांडाला आता नवं वळण लागलंय.
उकळतं तेल अंगावर टाकून शेतकऱ्याचा खून केल्याची घटना माढा तालुक्यातील सापटणे गावात घडली होती. मात्र या हत्याकांडाला आता नवं वळण लागलंय. टेभुर्णी पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी शेतकऱ्याच्या पत्नीला अटक केली. या शेतकऱ्याची हत्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नव्हे तर पत्नीनेच पतीच्या अंगावर उकळते तेल टाकून केली होती. वनिता शहाजी ढवळे असं पतीची हत्या करणाऱ्या पत्नीचं नाव आबे. टेंभुर्णी पोलिसांनी या घटनेचा छडा चारच दिवसात लावला असून खऱ्या गुन्हेगाराला ताब्यातही घेतलंय. पत्नी-पतीमध्ये घरात चारित्र्यावरुन संशयाचे वातावरण होते. दोघांना ही एकमेकांवर संशय होता. संशयाच्या नजरेतूनच हे टोकाचे पाऊल पत्नीनं उचललंय.
Latest Videos