मी पदाचा भुकेला नाही, आता राजीनामा द्यायला तयार; भाजपचा आणखी एक आमदार सोडणार पद?
Subhash Deshmukh : मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर माझी सहकार मंत्री आणि विद्यमान भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या घराबाहेरही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तर मराठा आरक्षणावर तात्काळ चर्चा करा अन् निर्णय घ्या; अशी विनंती भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी शिंदे सरकारला केली आहे.
सोलापूर, ३१ ऑक्टोबर २०२३ | राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलात तापल्याचे पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय नेत्यांच्या घरावर तसेच कार्यालयावर मराठा आंदोलकांकडून हल्ले करण्यात येत आहे. बीड जिल्ह्यामध्ये आमदारांच्या घरावर झालेल्या दगडफेक आणि जाळपोळीच्या पार्श्वभूमीवर वाढवली राज्यातील काही नेत्यांच्या निवासस्थानाची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. दरम्यान, माझी सहकार मंत्री आणि विद्यमान भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या घराबाहेरही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आमदार सुभाष देशमुख यांच्या घराबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला असून जवळपास दीडशेहून अधिक पोलीस बंदोबस्त आमदारांच्या घराबाहेर लावण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. ‘मराठा आरक्षणावर तात्काळ चर्चा करून निर्णय घ्यावा. माझी सरकारला विनंती आहे ‘, असे सुभाष देशमुख म्हणाले.