सोलापूरमधील नागणसूर मठाचे महास्वामी श्रीकंठ शिवाचार्य यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल; कारण काय?

सोलापूरमधील नागणसूर मठाचे महास्वामी श्रीकंठ शिवाचार्य यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल; कारण काय?

| Updated on: Apr 13, 2023 | 9:55 AM

सोलापूरमधील नागणसूर मठाचे महास्वामी श्रीकंठ शिवाचार्य यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी शांतवीरप्पा कळसगोंड यांचं मत काय? पाहा...

सोलापूर : सोलापूरमधील नागणसूर मठाचे महास्वामी श्रीकंठ शिवाचार्य यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोकरीचं आमिष दाखवून 28 लाख उकळल्याचा फिर्यादीचा आरोप आहे. अक्कलकोट तालुक्यातील नागणसूरमधील एका शिक्षण संस्थेचे चेअरमन असलेल्या श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी यांनी एका तरुणाला शाळेत शिक्षकाची नोकरी लावतो म्हणून 28 लाख उकळून फसवणूक केली, असा आरोप शांतवीरप्पा कळसगोंड यांनी केला आहे. फिर्यादी शांतवीरप्पा कळसगोंड यांनी दक्षिण अक्कलकोट पोलीस स्टेशनमध्ये याबाबत फिर्याद दाखल केली आहे. आपल्या शाळेत एका शिक्षकाची जागा रिक्त असून महिन्यात 28 लाख रुपये दिल्यास शिक्षक म्हणून नियुक्ती करण्याचे आश्वासन देत फसवणूक केली. फिर्यादीने आपली जमीन विकून महाराजांना 28 लाख रुपये दिले मात्र तरीही कॉल लेटर न आल्याने विचारपूस केल्यानंतर त्याला उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली. मी धर्म संकटात सापडलो आहे. त्यामुळे आता तुला नोकरी देऊ शकत नाही. तुला काय करायचे ते कर अशी उत्तरं दिली गेली. त्यामुळे शांतवीरप्पा कळसगोंड यांनी अक्कलकोट दक्षिण अक्कलकोट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

Published on: Apr 13, 2023 09:55 AM