“नितेश राणे ‘तो’ विचारही डोक्यात आणू नका, नाहीतर शिवसैनिक तुला फाडून खातील”
Solapur News : "नितेश राणे 'तो' विचारही डोक्यात आणू नको, नाहीतर शिवसैनिक तुला फाडून खातील" नितेश राणे यांना कुणी दिला इशारा? पाहा व्हीडिओ...
सोलापूर : युवासेनेचे नेते शरद कोळी यांनी नितेश राणे यांच्यावर टीका केली आहे. नितेश राणेंची औकात नाहीये. त्यांना अक्कल नाही. पिसाळलेली कुत्री कपडे फाडत असतात. नितेश राणे कपडे फाडायचा विचार डोक्यात आणू नको, शिवसैनिक तुला फाडून खातील, असा इशारा शरद कोळी यांनी दिला आहे.सत्तेचा माज आणू नको तुझ्यापेक्षा खालच्या भाषेत आम्हाला बोलता येते. नितेश राणे तुझं बोलणं योग्यता सोडून पुढे जात आहे, अवकातीत राहा, असंही ते म्हणालेत. 2024 साली राणे आणि तुझ्या सरकारला सगळ्यांना गुवाहाटी-गुजरातला ही जनता पाठवणार आहे. संजय राऊतच काय शिवसैनिकही तुझ्या बापाला सुद्धा भीत नाहीत. आदित्य साहेब खानदानी वाघ आहेत. तुम्ही राणे ही कोंबडीचे पिल्ले आहेत, असंही शरद कोळी म्हणालेत. कोंबडीच्या आवाजाची मिमिक्री करत शरद कोळी यांनी नितेश राणे यांची खिल्ली उडवली आहे.
Published on: Apr 29, 2023 03:17 PM
Latest Videos