सोलापुरात विडी कामगार महिलांचा रास्ता रोको, कोरोना लस मिळत नसल्यानं आक्रमक

सोलापुरात विडी कामगार महिलांचा रास्ता रोको, कोरोना लस मिळत नसल्यानं आक्रमक

| Updated on: Jul 11, 2021 | 3:22 PM

कोरोना प्रतिबंधक लस मिळत नसल्याने विडी कामगार महिलांनी रस्ता रोको केला.लसींचा पुरवठा झाला नसल्याने शहरातील लसीकरण केंद्रावर आज लसीकरण मोहीम बंद आहे.

सोलापूर:कोरोना प्रतिबंधक लस मिळत नसल्याने विडी कामगार महिलांनी रस्ता रोको केला.लसींचा पुरवठा झाला नसल्याने शहरातील लसीकरण केंद्रावर आज लसीकरण मोहीम बंद आहे. वारंवार लसीकरण मोहीम ठप्प होत असल्याने विडी कामगार महिलांना लसीसाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. अक्कलकोट सोलापूर रस्त्यावरील मुद्रा सनसाठी आरोग्य केंद्र समोर कामगार महिलांनी रास्तारोको केला.  एक-दोन दिवसांचा अपवाद वगळता सोलापूर शहरात लसीकरण मोहीम वारंवार ठप्प होतं आहे.