अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या शपथविधीवरून किरीट सोमय्या यांची पंचाईत; पहा काय बोलले
महाविकास आघाडी झाल्यानंतर सोमय्या यांनी सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, खासदार प्रफुल्ल पटेल या राष्ट्रवादीच्या तर उद्धव ठाकरे गटाचे अनिल परब आणि शिंदे गटातील सरनाईक, जाधव यांच्याविरोधात मोर्चे बांधणी केली होती. मात्र शिंदे गट भाजपसोबत गेला आणि सोमय्या यांच्या यादितील सरनाईक, जाधव ही नावं बाजूला गेली. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे वळवल्याचे अनेकांनी पाहिलं आहे
मुंबई : राज्यातील विविध भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार प्रकरणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अजित पवार यांच्यासह अनेक आमदारांना आपले लक्ष केलं होतं. मात्र त्यांनी कधीच भाजपच्या कोणत्याच नेत्यावर तसे आरोप केले नव्हते. पण महाविकास आघाडी झाल्यानंतर सोमय्या यांनी सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, खासदार प्रफुल्ल पटेल या राष्ट्रवादीच्या तर उद्धव ठाकरे गटाचे अनिल परब आणि शिंदे गटातील सरनाईक, जाधव यांच्याविरोधात मोर्चे बांधणी केली होती. मात्र शिंदे गट भाजपसोबत गेला आणि सोमय्या यांच्या यादितील सरनाईक, जाधव ही नावं बाजूला गेली. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे वळवल्याचे अनेकांनी पाहिलं आहे. मात्र आता सिंचन आणि राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकणातील राष्ट्रवादीचे अनेक नेतेच आता भाजप पुरस्कृत सरकारमध्ये सामिल झाल्याने सोमय्या यांची पंचाईत झाली आहे. त्यामुळे हिसाब तो देनाही पडेगा हा डायलॉग आता ते कोणाला मारणार असा सवाल सामान्य जनता करताना दिसत आहे. याचमुद्द्यावर त्यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी चेहऱ्यांवर कोणतेही भाव न आणता, न बोलता जाणं पसंत केलं आहे. त्यामुळे सोमय्या कोणाविरोधात आवाज उठविणार? असा प्रश्न केला जात आहे.