खारघर दुर्घटनेत उष्माघाताबरोबरच जमलेल्या लाखोंच्या गर्दीमुळे घात? व्हिडीओ आले समोर
VIDEO | खारघर दुर्घटनेत उष्माघाताबरोबर मृत्यू होण्याचं आणखी एक कारण उघड, समोर आलेले व्हिडीओ तुम्ही पाहिलेत का?
मुंबई : महाराष्ट्र भूषण पुरस्काराला उष्माघाताचं गालबोट लागलंय. नवी मुंबईतील खारघरच्या मैदानात या पुरस्कार सोहळ्यात हजर असलेल्या १३ श्रीसेवकांना उष्माघातानं आपला जीव गमवावा लागला आहे. या झालेल्या १३ जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात असताना मृत्यूचा आकडा सरकारकडून लपवला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. अशातच आता नवी मुंबईतील खारघर दुर्घटनेचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. त्यामुळे आणखी प्रश्न उद्भवले आहेत. उष्माघाताबरोबरच जमलेल्या लाखोंच्या गर्दीमुळे मोठा घात झाल्याचे या व्हिडीओवरून स्पष्ट होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या सोहळ्यात उन्हामुळे जे लोकं अत्यवस्थ झाले होते, त्यांना बाहेर काढण्यात या गर्दीमुळे मोठा अडथळे आले. उन्हाबरोबरच गर्दीचा अंदाज न आल्यानं या सोहळ्याचं नियोजन गडबडल्याचं चित्र या समोर आलेल्या व्हिडीओच्या माध्यमातून दिसतंय.