Ravikant Tupkar थेट म्हणले, ... तर शेतकऱ्यांची पोरं मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही

Ravikant Tupkar थेट म्हणले, … तर शेतकऱ्यांची पोरं मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही

| Updated on: Oct 09, 2023 | 2:21 PM

VIDEO | सोयाबीन कापूस उत्पादकांकडे महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने कायम दुर्लक्ष केल्याचे म्हणत येत्या काळात सरकारला सोयाबीन, कापूस उत्पादकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार, असल्याचे रविकांत तुपकर यांनी म्हटले इतकेच नाही तर त्यांनी मंत्र्यांना थेट इशाराच दिलाय.

बुलढाणा, ९ ऑक्टोबर २०२३ | सोयाबीन कापूस उत्पादकांकडे महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने कायम दुर्लक्ष केले आहे. सोयाबीन आता महिनाभरामध्ये बाजारात येण्याची शक्यता असताना सोयाबीनचे दर पडलेले आहेत. साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल सोयाबीनचा दर आहे. गेल्या वर्षी उत्पादन खर्च प्रतिक्विंटल हा 5700 होता, आता किमान 6500 च्या पुढे गेला आहे. तर गेल्या वर्षीचा 40-50 टक्के सोयाबीन, कापूस अजून शेतकऱ्यांकडे पडलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकारबद्दल प्रचंड रोष हा शेतकऱ्यांमध्ये आहे. टोमॅटो, कांद्यांच्या शेतकऱ्यांना राज्यकर्त्यांना अडवण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे येत्या काळात सरकारला सोयाबीन, कापूस उत्पादकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे. मुळात सरकारचे धोरणच शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याने सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांची पोर रस्त्यावर मंत्र्यांना फिरणं सुद्धा येणाऱ्या काळामध्ये मुश्किल करतील, असा इशाराच शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला.

Published on: Oct 09, 2023 02:21 PM