'जयंतराव तुम्ही नकली वाघांसोबत असली... ', मुख्यमंत्र्यांची हसत हसत थेट ऑफर

‘जयंतराव तुम्ही नकली वाघांसोबत असली… ‘, मुख्यमंत्र्यांची हसत हसत थेट ऑफर

| Updated on: Jul 02, 2024 | 5:28 PM

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जयंत पाटलांना एक खुली ऑफर दिल्याचे पाहायला मिळाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेल्या वाघनखांच्या मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जयंत पाटील यांना हसत हसत महायुतीमध्ये येण्याची खुली ऑफर दिली. बघा व्हिडीओ नेमके मुख्यमंत्री काय म्हणाले?

राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवल्याचे पाहायला मिळाले. इतकंच नाहीतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जयंत पाटलांना एक खुली ऑफर दिल्याचे पाहायला मिळाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेल्या वाघनखांच्या मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जयंत पाटील यांना हसत हसत महायुतीमध्ये येण्याची खुली ऑफर दिली. जयंतरावांनी म्हटलं होतं की, छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे कधी आणणार? ब्रिटनच्या म्युझियमशी सामजंस्य करार झाला आहे. लवकरच ही वाघनखे पाहायला मिळतील. जयंतराव, या महिन्यातच वाघनखे मिळतील. त्या वाघनखांचा योग्य वापर आम्ही नक्की करू. ही वाघनखे ठिकठिकाणी दर्शनासाठी ठेवू, एकनाथ शिंदे म्हणाले. पुढे ते असेही म्हणाले…. जयंतराव, अजून तुम्ही तिकडे नकली वाघांबरोबर आहात. थोडं असली वाघांबरोबर या”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Published on: Jul 02, 2024 05:28 PM