Special Report | विरोधक विखुरले…PM Narendra Modi यांची वाट मोकळी? -Tv9
पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या निकालात भाजपने बाजी मारली आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या चार राज्यांमध्ये भाजपने विजयी आघाडी घेतली, तर पंजाबमध्ये आपचा झाडू चालल्याने इतरांचा सुपडा साफ झाला.
नवी दिल्ली : पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या निकालात भाजपने बाजी मारली आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या चार राज्यांमध्ये भाजपने विजयी आघाडी घेतली, तर पंजाबमध्ये आपचा झाडू चालल्याने इतरांचा सुपडा साफ झाला. मात्र पाचपैकी एकाही राज्यात काँग्रेसला जादू दाखवता आली नाही. उत्तर प्रदेशात प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वात लढलेल्या काँग्रेसची तर पुरती वाट लागली. या दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये मंथन केले जाणार आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. अध्यक्ष निवडण्याबाबत या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा होणार असल्याची माहिती आहे. काँग्रेस नेते गुलाब नबी आझाद यांच्या घरी आज किंवा उद्या काँग्रेस नेत्यांची बैठक होणार आहे.पाच राज्यात पराभव झाल्यानंतर कॉंग्रेस तातडीची बैठक घेत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची शक्यता आहे.