Special Report | 6 मंत्री आणि 50हून अधिक आमदार कोरोना पॉझिटिव्ह !
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना राजकीय क्षेत्रातील व्यक्ती कोरोना संक्रमित होण्याचं प्रमाण देखील वाढत आहे. लोकप्रतिनिधी कोरोनाच्या विखळ्यात सापडत आहेत. आतापर्यंत राज्यातील 13 मंत्री आणि 70 आमदार कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज 18 हजार 466 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 4 हजार 558 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आज 20 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर राज्यात सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 66 हजार 308 वर पोहोचली आहे. कोरोनाच्या सुरुवातीपासूनची आकडेवारी पाहिली तर राज्यात आतापर्यंत 67 लाख 30 हजार 494 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 65 लाख 18 हजार 916 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची संख्या 1 लाख 41 हजार 573 झाली आहे.