Special Report | खातेदार तुरुंगात, पण खर्च झालेले पैसे कोण देणार ?

Special Report | खातेदार तुरुंगात, पण खर्च झालेले पैसे कोण देणार ?

| Updated on: Sep 16, 2021 | 9:46 PM

बिहारमध्ये बँक अधिकाऱ्याच्या चुकीने तब्बल साडे पाच लाख रुपये एका तरुणाच्या खात्यात गेले. आपल्या खातात साडे पाच लाख रुपये आल्याचं पाहून तरुणाला आश्चर्य नक्कीच झालं. पण त्याने याबाबत चौकशी न करता ते पैसे चक्क खर्चून टाकले. बँक अधिकाऱ्यांनी संबंधित तरुणाला वारंवार विनंती करुन, नोटीस पाठवून पैसे परत करण्यास सांगितलं. पण संबंधित तरुणाने प्रतिसाद दिलाच नाही

एखाद्या खात्यात पैसे टाकायचे असतील पण ते दुसऱ्याच एखाद्या खात्या गेल्याची अनेक उदाहरणं तुम्हाला ऐकायला किंवा पाहायला मिळाली असतील. बिहारमध्ये बँक अधिकाऱ्याच्या चुकीने तब्बल साडे पाच लाख रुपये एका तरुणाच्या खात्यात गेले. आपल्या खातात साडे पाच लाख रुपये आल्याचं पाहून तरुणाला आश्चर्य नक्कीच झालं. पण त्याने याबाबत चौकशी न करता ते पैसे चक्क खर्चून टाकले. बँक अधिकाऱ्यांनी संबंधित तरुणाला वारंवार विनंती करुन, नोटीस पाठवून पैसे परत करण्यास सांगितलं. पण संबंधित तरुणाने प्रतिसाद दिलाच नाही. शेवटी बँकेनं पोलिसांना सोबत घेत तरुणाला गाठलं आणि पैसे परत करण्यास सांगितलं. मात्र, त्यावेळी तरुणानं दिलेलं उत्तर धक्कादायक होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाच्या खातात 15 लाख रुपये टाकण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याचाच हा पहिला हप्ता असल्याचं आपल्याला वाटलं, असं धक्कादायक उत्तर त्या तरुणाने दिलं आहे. त्यामुळे आता त्या तरुणाने खर्च केलेले पैसे कुठून मिळणार असा सवाल बँकेला पडलाय.