Special Report | डेल्टा व्हेरियंट आहे काय?
पुढील 2-4 आठवड्यात कोरोना संसर्गाची तिसरी लाट राज्यात दाखल झालेली असेल. यामुळे महाराष्ट्रातील रुग्णसंख्या 8 लाखांपर्यंत जाईल, अशी शक्यता टास्कफोर्सने वर्तवली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत टास्क फोर्सच्या सदस्यांनी राज्यातील कोरोना स्थितीची माहिती सादर केली.
महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब आहे. दुसऱ्या कोरोना लाटेमधील हाहाकाराची तीव्रता आत्ता कुठं कमी होत असतानाच राज्यातील तज्ज्ञ डॉक्टर्सच्या टास्कफोर्सने महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा दिलाय. पुढील 2-4 आठवड्यात कोरोना संसर्गाची तिसरी लाट राज्यात दाखल झालेली असेल. यामुळे महाराष्ट्रातील रुग्णसंख्या 8 लाखांपर्यंत जाईल, अशी शक्यता टास्कफोर्सने वर्तवली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत टास्क फोर्सच्या सदस्यांनी राज्यातील कोरोना स्थितीची माहिती सादर केली. यावेळी त्यांनी तिसऱ्या कोरोना लाटेत राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या आधीपेक्षा दुप्पट म्हणजे 8 लाखांपर्यंत जाण्याचा धोका असल्याचं सांगितलं. यात 10 टक्के रुग्ण लहान मुलं आणि तरुण असतील असंही नमूद करण्यात आलेय. संसर्गाचा हाच पॅटर्न दुसऱ्या कोरोना लाटेत देखील पाहायला मिळाला होता.