Special Report | BJP – Shivsena भविष्यात युती नाहीच?-tv9
आदित्य म्हणाले की, त्यांच्याकडून जी वागणूक दिली जातेय…मैत्री होणार की नाही हा दुसरा भाग आहे. सध्या देशासमोरील विषय हे राजकारणापेक्षा महत्त्वाचे आहेत. आपल्यावर अन्याय करत असाल, तर मैत्रीचा विषय येतो कुठे.
मुंबईः आपल्यावर अन्याय होत असेल, तर मैत्रीचा विषय येतोच कुठे म्हणत भाजप-शिवसेना युतीच्या चर्चेचा आदित्य ठाकरेंनी एका घावात तुकडा पाडून पूर्णविराम दिला. आदित्य म्हणाले की, त्यांच्याकडून जी वागणूक दिली जातेय…मैत्री होणार की नाही हा दुसरा भाग आहे. सध्या देशासमोरील विषय हे राजकारणापेक्षा महत्त्वाचे आहेत. आपल्यावर अन्याय करत असाल, तर मैत्रीचा विषय येतो कुठे. सध्या बिगर भाजप राज्यात राजकीय षडयंत्र सुरू आहे. आम्ही टक्कर द्यायला सज्ज आहोत. नैराश्यातून सुरू असलेले हे घाणेरडे राजकारण थांबले पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. सध्या येणाऱ्या काही दिवसांत मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. त्यासाठी भाजप आणि शिवसेना या दोघांनीही आकाश-पाताळ एक करत आत्तापासूनच तयारी सुरू केलीय. राज्याच्या राजकारणा सुरू असलेल्या कुरघोड्याही त्याचाच एक भाग असल्याची चर्चा आहे. यात अनेकदा भाजप-शिवसेना युतीचा मुद्दा अनेकजण उगाळतात. त्याला आज आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले आहे.