Special Report | तालिबान्यांचं थैमान, भारतावर काय परिणाम?
अफगाणिस्तानची जमीन कोणत्याही देशाविरोधात वापरण्याची परवानगी देणार नाही. मात्र, भारतानं अफगाणिस्तानात केलेली गुंतवणूक जनतेच्या फायद्याची आहे. भारतानं त्यांचे प्रकल्प सुरु ठेवावेत. मात्र, इतिहास पाहिला तर तालिबान्यांनी कधीच दिलेला शब्द पाळलेला नाही. त्यामुळे भारतासोबत तालिबान्यांचे संबंध कधीच चांगले राहिलेले नाहीत. अशावेळी भारत नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर तालिबाननं दुसऱ्या दिवशी भारताबाबत मोठं विधान केलं आहे. काय आहे ते वक्तव्य आणि भारत तालिबानबाबत काय भूमिका घेणार? असा प्रश्न आता विचारला जात आहे. एकीकडे अफगाणिस्तानातून सुटका झालेल्या भारतीयांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. तर दुसरीकडे भारतात शिकणाऱ्या अफगाणी विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांची चिंता सतावत आहे. अफगाणिस्तानातील भारतीय प्रकल्पांना बाधा येणार नाही, असं आश्वासन तालिब्यांनी दिलं आहे. एका पाकिस्तानी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अफगाणिस्तानातील भारतीय प्रकल्पांना धक्का लावणार नाही, असा दावा तालिबानचा प्रवक्ता सोहेल शाहिन याने केलाय. अफगाणिस्तानची जमीन कोणत्याही देशाविरोधात वापरण्याची परवानगी देणार नाही. मात्र, भारतानं अफगाणिस्तानात केलेली गुंतवणूक जनतेच्या फायद्याची आहे. भारतानं त्यांचे प्रकल्प सुरु ठेवावेत. मात्र, इतिहास पाहिला तर तालिबान्यांनी कधीच दिलेला शब्द पाळलेला नाही. त्यामुळे भारतासोबत तालिबान्यांचे संबंध कधीच चांगले राहिलेले नाहीत. अशावेळी भारत नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.