Special Report | निधीवाटपावरुन बोलताना Ajit Pawar यांची गाडी घसरली-tv9

Special Report | निधीवाटपावरुन बोलताना Ajit Pawar यांची गाडी घसरली-tv9

| Updated on: Apr 01, 2022 | 8:39 PM

कधी कधी बोलता बोलता दादांची गाडी एका ट्रॅकवरून कधी दुसऱ्या ट्रॅकवर जाते हे त्यांनाही कळत नाही. आज बारामतीतल्या सभेत पुन्हा त्याची प्रचिती आली आहे.

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या बेधडक वक्तव्यांसाठी नेहमी चर्चेत असतात. मात्र अजित दादा ग्रामीण बाजात बोलताना कधी कधी भलतच बोलून जातात. याची प्रचिती याआधीही महाराष्टाला आली आहे. त्यांच्या काही वादग्रस्त वक्तव्याचा मनस्ताप त्यांनाही झाला आहे. ते त्यांनी भर सभेत अनेकदा बोलूनही दाखवलं आहे. सकाळी सातच्या आत मिटिंग घेणारा आणि धडाडीने काम करणारा नेते म्हणून अजित पवारांची ओळख आहे. मात्र हे अजित पवार तेवढ्याच धडाडीने स्टेजवर बोलतात. भर सभेत अजित पवार अनेकदा विरोधकांना ओपन चॅलेंज देतात. त्यांनी विजय शिवतारेंना पुन्हा आमदार न होऊन देण्याचं दिलेलं चॅलेंज अजूनही लोक विसले नाहीत. ते फक्त चॅलेंजच देत नाहीत. तर ते खरंही करून दाखवतात. मात्र कधी कधी बोलता बोलता दादांची गाडी एका ट्रॅकवरून कधी दुसऱ्या ट्रॅकवर जाते हे त्यांनाही कळत नाही. आज बारामतीतल्या सभेत पुन्हा त्याची प्रचिती आली आहे.

Published on: Mar 27, 2022 09:13 PM