Special Report | Sharad Pawar यांच्या घरावरील हल्ल्यानंतर Ajit Pawar संतापले-tv9

Special Report | Sharad Pawar यांच्या घरावरील हल्ल्यानंतर Ajit Pawar संतापले-tv9

| Updated on: Apr 09, 2022 | 9:11 PM

शरद पवारांच्या मुंबईतल्या घरावर हल्ला झाला. त्यानंतर पुन्हा गृहखात्यावर प्रश्नचिन्हं निर्माण करण्यात आलेत. विरोधकांबरोबरच खुद्द अजित पवारांनी पोलीस कुठं होते ?, असा सवाल केलाय..तर मीडियाला माहिती मिळाली मग पोलिसांना का नाही, ?, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना केलाय. पोलीस कमी पडले, हे अजित पवारांनीही जाहीरपणे सांगितलंय.  

शरद पवारांच्या मुंबईतल्या घरावर हल्ला झाला. त्यानंतर पुन्हा गृहखात्यावर प्रश्नचिन्हं निर्माण करण्यात आलेत. विरोधकांबरोबरच खुद्द अजित पवारांनी पोलीस कुठं होते ?, असा सवाल केलाय..तर मीडियाला माहिती मिळाली मग पोलिसांना का नाही, ?, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना केलाय. पोलीस कमी पडले, हे अजित पवारांनीही जाहीरपणे सांगितलंय.  गुरुवारी हायकोर्टाचा एसटीच्या संपावर निकाल आला. कर्मचाऱ्यांनी त्या निर्णयाचं स्वागतही केलं.  त्यानंतर शुक्रवारी जवळपास 3 वाजून 20 मिनिटांनी संपकरी सिल्हवर ओक निवासस्थानी आले. त्यावेळी पवारांच्या निवासस्थानी 2 ते तीनच पोलीस कॉन्स्टेबल होते दुपारी 3 वाजून 40 मिनिटांनी म्हणजेच 20 मिनिटांनंतर पोलीस फौजफाट्यासह सिल्व्हर ओकवर आले. त्या 20 मिनिटांत आंदोलकांनी पवारांच्या निवासस्थानाला घेराव घालत चप्पलफेक करत घोषणाबाजी सुरु होत्या.