Special Report | अजित पवारांसह पार्थ पवार आणि नातेवाईक आयकरच्या रडारवर
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पार्थ पवार आणि बहिणींच्या मालमत्तांवरही आयकर विभागाने धाडी मारल्या आहेत. त्यामुळे अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. माझ्याशी संबंधित कंपन्यांवर धाड टाकली त्याचं मला काही वाटत नाही. पण माझ्या बहिणींच्या मालमत्तांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. केवळ अजित पवारांच्या नातलग म्हणून धाडी टाकल्या असतील तर ते योग्य नाही, असा संताप अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील चार साखर कारखान्यांवर आयकर विभागाने आज पहाटे धाड टाकली. त्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. माझ्याशी संबंधित कंपन्यांवर धाड टाकली याबद्दल मला काही म्हणायचं नाही. मी पण एक नागरिक आहे. मला एका गोष्टीचं दु:ख आहे, ज्यांची 35-40 वर्षापूर्वी लग्न झाली, त्यांचा चांगल्या पद्धतीने संसार सुरु आहे. त्या तीन बहिणींवर, कोल्हापूरच्या आणि पुण्यातील दोन बहिणींवर धाडी टाकल्या. त्याचं कारण मला माहिती नाही. ते व्यवस्थित आपलं जीवन जगत आहेत. त्यांच्या मुलांची-मुलींची लग्न झाली आहेत, नातवंडं आहेत. अजित पवारांचे नातेवाईक म्हणून धाड टाकली असेल तर राज्यातील जनतेने याचा जरुर विचार करावा, कोणत्या स्तरावर जाऊन या संस्थांचा वापर केला जातो, हे पाहावं, असं अजित पवार म्हणाले.