Special Report | भोंग्यांवरून पुन्हा राज ठाकरे V/s अजित पवार-TV9
भोंग्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चांगलं ठणकावलंय. सरकारला अल्टिमेटम द्यायला हुकूमशाही नाही. जे काही अल्टिमेटम द्यायचा तो घरातल्यांना द्या, अशा शब्दात अजित पवारांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय.
भोंग्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चांगलं ठणकावलंय. सरकारला अल्टिमेटम द्यायला हुकूमशाही नाही. जे काही अल्टिमेटम द्यायचा तो घरातल्यांना द्या, अशा शब्दात अजित पवारांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय. भोंग्यांविरोधातलं मनसेनं जे आंदोलन छेडलंय, त्यावर राज ठाकरे आजही ठाम आहेत. मशिदीवरील भोंगे उतरेपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय राज ठाकरेंनी घेतलाय. मात्र अजित पवारांनी अशा आंदोलनांवर थेट कारवाईचा इशारा दिलाय. जे अधिकृत भोंगे आहेत किंवा परवानगी घेऊन भोंगे वाजवतील, त्याला सरकारचा आक्षेप नाही..मात्र आवाजाची मर्यादा पाळावीच लागेल, नाही तर कारवाई होईल, हे अजित पवारांनी स्पष्ट केलंय.
Published on: May 05, 2022 09:29 PM
Latest Videos