Special Report | शिवसेना खासदार संजय राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवारांचा राऊतांना इशारा
शिवसेना भवनावर कुणीही आंदोलन करायचं नाही, अशा शब्दात राऊत यांनी भाजप कार्यकर्त्यांना एकप्रकारे सज्जड दम भरलाय. त्याबाबत बोलताना अजित पवार यांनी कोणत्याही पक्षाने अशाप्रकारे गुंडगिरीची भाषा बोलणं योग्य नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला थेट इशारा दिलाय. शिवसेना गुंडगिरी करते. त्यासाठी आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. शिवसेना भवनावर कुणीही आंदोलन करायचं नाही, अशा शब्दात राऊत यांनी भाजप कार्यकर्त्यांना एकप्रकारे सज्जड दम भरलाय. त्याबाबत बोलताना अजित पवार यांनी कोणत्याही पक्षाने अशाप्रकारे गुंडगिरीची भाषा बोलणं योग्य नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय. तसंच शिवसेनेच्या प्रमुखांकडेच सध्या राज्याचं नेतृत्व आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणं त्यांची जबाबदारी असल्याचंही अजितदादा म्हणालेत.
Latest Videos