Special Report | साताऱ्यातले दोन्ही राजे पुन्हा एकदा आमनेसामने
सातारा नगरपालिकेची निवडणूक जवळ येत आहे. त्यामुळे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्र राजे यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. आता साताऱ्यात चर्चेत असणारे कारण म्हणजे सातारा एमआयडीसी परिसरात शिवेंद्रराजे भोसले यांनी घेतलेली पंडित ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची जागा. या प्रकरणात खासदार उदयनराजे भोसले यांनी हस्तक्षेप करून कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप केला आहे.
सातारा नगरपालिकेची निवडणूक जवळ येत आहे. त्यामुळे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्र राजे यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. आता साताऱ्यात चर्चेत असणारे कारण म्हणजे सातारा एमआयडीसी परिसरात शिवेंद्रराजे भोसले यांनी घेतलेली पंडित ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची जागा. या प्रकरणात खासदार उदयनराजे भोसले यांनी हस्तक्षेप करून कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप केला आहे. साताऱ्यातील पंडित ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील 80 कामगारांना 1 फेब्रुवारीपासून कामावरून अचानक कमी करण्यात आलं आहे. त्यानंतर हे सर्व कर्मचारी आक्रमक झाले आहेत.
2016 पासून या कर्मचाऱ्यांचा पगार थकीत आहे आणि या कंपनीचा विषय न्यायप्रविष्ठ आहे. तरी देखील या कंपनीची जागा आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि त्यांच्या पत्नी वेदांतिकाराजे भोसले यांनी बेकायदेशीररित्या खरेदी केला केली असल्याचा आरोप करण्यात येतोय. याप्रकरणी कंपनीत काम करणारे कामगार आक्रमक झाले होते. त्यांनी कंपनीच्या गेटसमोरच सामूहिक आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी ही कंपनीची जागा कवडीमोल भावाने बेकायदेशीररित्या खरेदी केली असल्याचा आरोप या कंपनीतील कामगारांनी केला आहे. कंपनीची 42 कोटी रुपयांची मालमत्ता असताना 8 कोटी रुपये या भावात ही कंपनी कवडीमोल भावाने विकत घेतल्याचं बोललं जात आहे. मात्र पोलिसांनी वेळेत या आंदोलनात हस्तक्षेप करत कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.