Special Report | संजय राऊत आणि नारायण राणेंमध्ये शाब्दिक चकमक!
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राणेंना जोरदार टोला लगावलाय. 'पाकिस्तान आणि बांग्लादेशातून आलेले घुसखोर महाराष्ट्र आणि देशात हैदोस घालतात, वातावरण बिघडवतात. तसं भाजपमध्ये आलेल्या घुसखोरांनी माहौल बिघडवला आहे. त्यामुळे भाजपला शुद्धीकरणाची गरज आहे', अशी टीका संजय राऊत यांनी केलीय. संजय राऊत आणि विनायक राऊत हे दोघेही माझ्या दृष्टीने वायफळ बडबड करणारे नेते आहेत, अशी टीका राणेंनी केलीय.
राज्यात नारायण राणे यांच्या एका वक्तव्यानंतर शिवसेना विरुद्ध भाजप असं चित्र निर्माण झालं आहे. अशावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राणेंना जोरदार टोला लगावलाय. ‘पाकिस्तान आणि बांग्लादेशातून आलेले घुसखोर महाराष्ट्र आणि देशात हैदोस घालतात, वातावरण बिघडवतात. तसं भाजपमध्ये आलेल्या घुसखोरांनी माहौल बिघडवला आहे. त्यामुळे भाजपला शुद्धीकरणाची गरज आहे’, अशी टीका संजय राऊत यांनी केलीय. संजय राऊत आणि विनायक राऊत हे दोघेही माझ्या दृष्टीने वायफळ बडबड करणारे नेते आहेत. संजय राऊतांना त्याचसाठी ठेवलंय. संपादक सोडा त्यांना हे बोलायलाच ठेवलंय. काय तो विनायक राऊत. ते दोन राऊतच शिवसेनेला डुबवणार आहेत. आतमध्ये एकदम खोल तलावात, अशी टीका राणे यांनी केली.
Published on: Aug 27, 2021 10:05 PM
Latest Videos