Special Report | आरक्षणासाठी घटनादुरुस्ती शक्य आहे की नाही?

Special Report | आरक्षणासाठी घटनादुरुस्ती शक्य आहे की नाही?

| Updated on: Aug 05, 2021 | 10:01 PM

आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा हटवण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री व मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. त्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आव्हान देत सोनिया गांधींसह विरोधकांना पंतप्रधान मोदींना पत्र पाठवाला सांगा असं फडणवीस म्हणाले.

102 व्या घटनादुरुस्तीमध्ये बदल करुन आरक्षणाचा अधिकार राज्यांना देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. त्यावर आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा हटवण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री व मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. त्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आव्हान देत सोनिया गांधींसह विरोधकांना पंतप्रधान मोदींना पत्र पाठवाला सांगा असं फडणवीस म्हणाले. तर भाजपच्या केंद्र सरकारने संसदेत घटनात्मक तरतूद करून आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या आरक्षणाला 50 टक्क्यांच्या मर्यादेपासून संरक्षण दिले. मराठा आरक्षणासाठी तसंच संरक्षण का शक्य नाही? असा सवाल अशोक चव्हाण यांनी केला आहे.