Special Report | सरकार झोपलं का? लोणकर मृत्यूप्रकरणावरून अमित ठाकरे संतप्त

Special Report | सरकार झोपलं का? लोणकर मृत्यूप्रकरणावरून अमित ठाकरे संतप्त

| Updated on: Jul 06, 2021 | 9:51 PM

लोणकर कुटुंबीयांच्या मागे महाराष्ट्र नवनिर्माण सेना असून भविष्यात एमपीएससी विध्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे.’ असे वक्तव्य अमित ठाकरे यांनी केले. महाराष्ट्र सरकारमधील 2 लाख पदं रिक्त आहेत. हे सरकार झोपलं आहे का? असं काही पाऊल उचलल्यावरच सरकार जागं होणार का? असा सवाल अमित ठाकरे यांनी विचारलाय.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने स्वप्नील लोणकर या २४ वर्षीय तरुणाने पुण्यात आत्महत्या केली. त्यानंतर मनसे (MNS) नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी आज स्वप्नीलच्या आईवडिलांची त्यांच्या मूळ गावी केडगाव, तालुका दौड येथे जाऊन भेट घेतली. यावेळी अमित ठाकरेंनी लोणकर कुटुंबीयांचे सांत्वन केले. ‘ही घटना दुर्दैवी असून सरकारने अशा पुन्हा घटना घडू नये याची खबरदारी घेतली पाहिजे. लोणकर कुटुंबीयांच्या मागे महाराष्ट्र नवनिर्माण सेना असून भविष्यात एमपीएससी विध्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे.’ असे वक्तव्य अमित ठाकरे यांनी केले. महाराष्ट्र सरकारमधील 2 लाख पदं रिक्त आहेत. हे सरकार झोपलं आहे का? असं काही पाऊल उचलल्यावरच सरकार जागं होणार का? असा सवाल अमित ठाकरे यांनी विचारलाय.