अन् यापुढे उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर शुद्धीकरण! नवनीत राणा पुन्हा एकदा बरसल्या

अन् यापुढे उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर शुद्धीकरण! नवनीत राणा पुन्हा एकदा बरसल्या

| Updated on: Apr 06, 2023 | 10:36 PM

VIDEO | उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची माती केली आणि.., खासदार नवनीत राणा यांचा पुन्हा उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा हल्लाबोल, बघा टिव्ही ९ मराठीचा स्पेशल रिपोर्ट

मुंबई : हनुमान जयंती निमित्ताने अमरावती खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीमध्ये सामुहिक हनुमान चालिसा पठण केलं. यानंतर नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात नव्या लढाईची घोषणा झाली. तर यापुढे उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर शुद्धीकरण करा, असं आवाहन राणांनी कार्यकर्त्यांना केलं. यावेळी तुरूंगाच्या आठवणीने नवनीत राणा यांना आश्रूदेखील अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. अमरावतीमध्ये नवनीत राणा उद्धव ठाकरे यांच्यावर चांगल्याच बरसल्या. गेल्या वर्षी नवनीत राणा यांनी मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिला होता. यानंतर राणा दामप्त्याला अटक झाली. त्वरीत राणा यांची सुटका होऊ नये म्हणून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केल्याचा आरोपही नवनीत राणा यांनी केला. बघा यासंदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट

Published on: Apr 06, 2023 10:36 PM