Special Report | पुण्यातल्या निर्बधावरून अमृता फडणवीसांचा हल्लाबोल!

Special Report | पुण्यातल्या निर्बधावरून अमृता फडणवीसांचा हल्लाबोल!

| Updated on: Aug 05, 2021 | 9:26 PM

. धागा हॅन्डलूम हातमागावरील कलाकारांनी अप्रतिम घडवलेल्या वस्तूंच्या महोत्सवाचे अमृता फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन पुण्यनगरीत पार पडलं. यावेळी पुण्याच्या निर्बंधाबाबत असलेल्या पुणेकरांच्या आक्षेपावर बोलताना त्यांनी राज्य सरकारला टोला लगावला.

ज्या शहरात कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी आहे, तिथे राज्य सरकारने निर्बंधांमध्ये शिथीलता दिली आहे. मात्र पुण्यात पॉझिटिव्हिटी रेट कमी असूनही राज्य सरकारने पुण्यातले निर्बंध जैसे थे ठेवले आहेत. याच मुद्दयावर अमृता फडणवीस यांनी आक्षेप घेत पुण्याबाबत सरकारने असा निर्णय का घेतला हे कळत नसल्याचं म्हटलं. त्याचवेळी कोरोनाचे नियम पाळून खूप शॉपिंग करा, असा सल्लाही अमृता फडणवीसांनी पुणेकरांना दिला. धागा हॅन्डलूम हातमागावरील कलाकारांनी अप्रतिम घडवलेल्या वस्तूंच्या महोत्सवाचे अमृता फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन पुण्यनगरीत पार पडलं. यावेळी पुण्याच्या निर्बंधाबाबत असलेल्या पुणेकरांच्या आक्षेपावर बोलताना त्यांनी राज्य सरकारला टोला लगावला.