Special Report | ठाकरे सरकारचे आणखी एक मंत्री अटकेत

Special Report | ठाकरे सरकारचे आणखी एक मंत्री अटकेत

| Updated on: Feb 23, 2022 | 10:53 PM

पहाटेपासूनच्या चौकशीनंतर अखेर ईडीने राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांना अटक केली आहे. त्यानंतर महाविकास आघाडी आणि भाजप पुन्हा आमनेसामने आले आहेत. पण नवाब मलिक यांना अटक का झाली आहे? आणि नवाब मलिक यांच्यासमोर आता पुढे पर्याय काय आहेत? याबाबतही आपण आढावा घेणार आहोत. मात्र या अटकेने राज्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ माजली आहे. नवाब यांच्यानंतर आणखी मंत्र्यांना अटक होणार असा इशारा भाजपकडून देण्यात आला आहे. तर भाजप हे सर्व महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी करत आहे. असा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे.

पहाटेपासूनच्या चौकशीनंतर अखेर ईडीने राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांना अटक केली आहे. त्यानंतर महाविकास आघाडी आणि भाजप पुन्हा आमनेसामने आले आहेत. पण नवाब मलिक यांना अटक का झाली आहे? आणि नवाब मलिक यांच्यासमोर आता पुढे पर्याय काय आहेत? याबाबतही आपण आढावा घेणार आहोत. मात्र या अटकेने राज्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ माजली आहे. नवाब यांच्यानंतर आणखी मंत्र्यांना अटक होणार असा इशारा भाजपकडून देण्यात आला आहे. तर भाजप हे सर्व महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी करत आहे. असा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे. नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली आहे. ईडीनं नवाब मलिक यांच्या अटकेनंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देखील माहिती दिली असल्याचं कळतंय. ईडीनं अटक केली असल्यानं नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला जाण्याची शक्यता आहे.