AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | आर्यन खानला क्लीनचीट, समीर वानखेडे अडचणीत?-TV9

Special Report | आर्यन खानला क्लीनचीट, समीर वानखेडे अडचणीत?-TV9

| Updated on: May 27, 2022 | 9:48 PM

सुपरस्टार शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला कॉर्डिलिया क्रुज ड्रग्ज पार्टी प्रकरणीत अटक झाल्यानंतर सर्वातआधी राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनीच एनसीबी आणि समीर वानखेडेंच्या कारवाईवर सवाल उपस्थित केले होते.

सुपरस्टार शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला कॉर्डिलिया क्रुज ड्रग्ज पार्टी प्रकरणीत अटक झाल्यानंतर सर्वातआधी राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनीच एनसीबी आणि समीर वानखेडेंच्या कारवाईवर सवाल उपस्थित केले होते. आर्यन खानची अटक खंडणी गोळा करण्यासाठी झाल्याचा आरोप करत मलिकांनी समीर वानखेडेंविरोधात मोर्चाच उघडला होता. आता आर्यन खान प्रकरणातील नवाब मलिकांचे समीर वानखेडेंवरील हेच आरोप खरे होताना दिसतात. कारण ज्या कॉर्डिलिया क्रुज ड्रग्ज पार्टी प्रकरणी शाहरूखचा मुलगा आर्यन खानला एनसीबीच्या मुंबई झोनचे तत्कालीन डायरेक्टर समीर वानखेडेंनी अटक केली होती… त्याच आर्यन खानला तब्बल 8 महिन्यांनंतर एनसीबीनचं क्लीनचीट दिलीय. कॉर्डिलिया क्रुज पार्टीवेळी आर्यन खानकडे ड्रग्ज सापडलं नाही. आर्यन खानसह इतर 6 जणांविरोधात पुरावे नाहीत. समीर वानखेडे आणि त्यांच्या टीमकडून चूक झाली. आर्यन खानला अटक ही समीर वानखेडे आणि टीमची चूक असल्याचं खुद्द एनसीबीनचं कोर्टात म्हंटल्यानं आता केंद्र सरकारनं देखील समीर वानखेडेंवर कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.