Ahmednagar | व्यावसायिकाच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून लुटण्याचा प्रयत्न, थरार CCTV मध्ये कैद
डोळ्यांत मिरचीची पूड टाकून लूटण्याचा प्रयत्न झालाय. आपल्या दैनंदिन कामावरून घरी परतत असताना एका व्यावसायिकासोबत हा प्रकार घडला आहे. घराजवळ पोहोचलेला हा व्यावसायिक घरासमोर कार पार्किंग करत असतानाच कारमधून आलेल्या काही व्यक्तींनी या व्यावसायिकाच्या डोळ्यांत मिरचीची पूड टाकली. तसेच हत्याराचा धाक दाखवत लुटण्याचा प्रयत्न केला.
डोळ्यांत मिरचीची पूड टाकून लूटण्याचा प्रयत्न झालाय. आपल्या दैनंदिन कामावरून घरी परतत असताना एका व्यावसायिकासोबत हा प्रकार घडला आहे. घराजवळ पोहोचलेला हा व्यावसायिक घरासमोर कार पार्किंग करत असतानाच कारमधून आलेल्या काही व्यक्तींनी या व्यावसायिकाच्या डोळ्यांत मिरचीची पूड टाकली. तसेच हत्याराचा धाक दाखवत लुटण्याचा प्रयत्न केला. अहमदनगरच्या नागापूर परिसरातून ही घटना समोर आली आहे. संदीप नागरगोजे असे व्यापाऱ्याचे नाव असून नागापूर परिसरातील आदर्श नगरमधील गुरुकृपा कॉलनीत हा प्रकार घडला. हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.
संदीप नागरगोजे यांनी आपल्या घरासमोर गाडी पार्क करताच पाळत ठेवून असलेल्या चोरट्यांनी त्यांच्याशेजारी आपली कार उभी केली. त्यातील एक चोर खाली उतरला आणि त्याने नागरगोजे यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली. नागरगोजे यांनी प्रसंगावधान राखत पैशांची बॅग घराच्या गेटच्या आत फेकली आणि चोरट्यांचा जोरदार प्रतिकार केला. चोरट्यांनी तेथून पळ काढला.