Special Report | लग्नासाठी बॅनर लावलं…आणि तब्बल 5 हजार प्रस्ताव आले?
हल्ली घटस्फोटीत किंवा दुसरं लग्न करणाऱ्यांना तर सोडाच, पण शिकल्या-सवरलेल्यांना सुद्धा मुली मिळणं कठीण झालंय. मात्र औरंगाबादचे हे पाटील त्याला अपवाद आहेत. एकीकडे डॉक्टर-इंजिनीअरिंगच्या डिग्र्या घेतलेली हजारो पोरं बिनलग्नाची बसलीयत. पण या रमेश पाटलांसोबत लग्न करण्यासाठी बायकांची रांग लागलीय. ऐकून तुम्हाला धक्का बसेल, पण पाटलांच्या दाव्याप्रमाणे मागच्या दोन दिवसात त्यांना लग्नासाठी वेटिंगवरचे कॉल पकडून हजारो फोन आले.

हे तेच रमेश पाटील आहेत, ज्यांनी उमेदवार बायको पाहिजे म्हणून औरंगाबादेत पोस्टर लावलं होतं. ते बॅनर महिला कार्यकर्त्यांनी फाडलं खरं. मात्र फाडण्याआधी काही तास झळकलेल्या त्याच बॅनरनं पाटलांचं नशीब फळफळलं. त्याचा परिणाम आता फोन वाजून-वाजून मोबाईलची बॅटरी गरम होतेय. पण पाटलासाठी लग्नाच्या प्रस्तावाचे फोन थांबत नाहीयत. बरं फक्त या महाशयांना लग्नाचे प्रस्तावच येत नाहीयत, तर ज्या बॅनरविरोधात महिलांनी आंदोलन केलं, त्याच बॅनरबद्दल
लग्नाचे प्रस्ताव देणाऱ्या महिलांकडून रमेश पाटलांबाबत सहानुभूती सुद्धा व्यक्त होतेय.