Special Report | बंडातात्या कराडकर यांच्यावर 2 गुन्हे…समज देऊन सुटका !
आज सकाळी सातारा पोलीस बंडातात्या यांच्या फलटणमधील कराडकर यांच्या मठात पोहोचले. यावेळी पोलिसांनी कराडकर यांना मठातून ताब्यात घेतलं. त्यानंतर पोलिसांनी त्यांना समज देऊन सोडलं आहे. मात्र, 9 फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा चौकशीला हजर राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी बंडातात्या कराडकर यांना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. बंडातात्या कराडकर यांनी सुपरमार्केटमध्ये वाइन विक्री करण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन करताना वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे त्यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करण्यात येत होता. राष्ट्रवादीकडून राज्यभरात आंदोलन केलं जात असून गुन्हा दाखल न झाल्यास कोर्टात जाऊन खटला दाखल करण्याचा इशारा दिला होता. यानंतर आज सकाळी सातारा पोलीस बंडातात्या यांच्या फलटणमधील कराडकर यांच्या मठात पोहोचले. यावेळी पोलिसांनी कराडकर यांना मठातून ताब्यात घेतलं. त्यानंतर पोलिसांनी त्यांना समज देऊन सोडलं आहे. मात्र, 9 फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा चौकशीला हजर राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत.

आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?

हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला

'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार

पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं
