Special Report | निर्णय कॅबिनेटचा, टार्गेटवर महिला का?-TV9
वाईन धोरणाविरोधात बोलताना कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. बंडातात्या कराडकर यांच्या या वक्तव्यावर आता राज्यभरात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपसह सर्वच पक्षाच्या महिला नेत्यांनी बंडातात्या यांच्यावर जोरदार टीका केलीय. तसंच त्यांनी माफी मागावी अशी मागणीही करण्यात येत आहे.
भंडारा : महाविकास आघाडी सरकारच्या वाईन धोरणाविरोधात बोलताना कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. बंडातात्या कराडकर यांच्या या वक्तव्यावर आता राज्यभरात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपसह सर्वच पक्षाच्या महिला नेत्यांनी बंडातात्या यांच्यावर जोरदार टीका केलीय. तसंच त्यांनी माफी मागावी अशी मागणीही करण्यात येत आहे. सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे दारु पितात, असं वक्तव्य बंडातात्या यांनी केलं होतं. त्याबाबत पत्रकारांनी विचारलं असता हे आपण पुराव्यानिशी सिद्ध करु शकतो, असंही बंडातात्या पुढे जाऊन म्हणाले. त्यामुळे हा वाद चिखळत गेला आणि बंडातात्यांवर टीकेची झोड उडाली. महिला नेत्या चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. महिलांबाबत असे वक्तव्य करणे योग्य नाही, अशा प्रतिक्रिया सर्व स्तरातून उमटू लागल्या आहेत.
Latest Videos