Special Report | बारीक व्हा, अजित दादांचा पोलीस अधिकाऱ्यांना फिटनेस मंत्र -tv9
आज अजित पवार पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर होते..पिंपरी चिंचवडमधल्या आंतरराष्ट्रीय हॉकी प्रशिक्षण केंद्राचं त्यांनी उद्घाटन केलं...आणि हातात थेट हॉकीची स्टीक घेतली...नंतर गोलपोस्टकडे भेदक नजर टाकली...आणि एकापाठोपाठ एक असे ३ गोल मारले.
सत्ता असो..किंवा नसो..पद असो किंवा नसो..अजितदादांचा दरारा कायम असतो…आज अजित पवार पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर होते..पिंपरी चिंचवडमधल्या आंतरराष्ट्रीय हॉकी प्रशिक्षण केंद्राचं त्यांनी उद्घाटन केलं…आणि हातात थेट हॉकीची स्टीक घेतली…नंतर गोलपोस्टकडे भेदक नजर टाकली…आणि एकापाठोपाठ एक असे ३ गोल मारले. बरं..अजितदादा खेळाच्या मैदानात उतरण्याची ही काही पहिली वेळ नव्हती…याआधीही दादांनी क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी केली होती…एकदा तर ते चक्क विटीदांडूही खेळले होते…अजितदादा कधी कधी फारच मनमोकळे वागतात…तर कधी ते कठोरही होतात…आता मास्कचंच उदाहरण घ्या…मास्कचा नियम दादा स्वत: काटेकोरपणे पाळतात..आणि इतरांनाही मास्क घालण्याचा सल्ला देतात..कधी ते नियम न पाळणाऱ्यांवर खडसावतातही..एकदा तर दादांनी प्रसारमाध्यमांच्या बूमवरच सॅनिटायझर फवारलं होतं..मास्कबद्दल दादा जितके कडक आहेत..तितकेच ते फिटनेसबद्दलही जागरुक आहेत…