Special Report | 'कोल्हापूर उत्तर' निवडणुकीची रणधुमाळी - Tv9

Special Report | ‘कोल्हापूर उत्तर’ निवडणुकीची रणधुमाळी – Tv9

| Updated on: Mar 19, 2022 | 9:36 PM

काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर जागेची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. भाजपनं पंढरपूर आणि देगलूर प्रमाणं या जागेवर देखील ताकदीनं निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे.

कोल्हापूर : काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर जागेची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. भाजपनं पंढरपूर आणि देगलूर प्रमाणं या जागेवर देखील ताकदीनं निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. भाजपनं यावेळी उमदेवारी जाहीर करण्यात देखील आघाडी घेतली आहे. भाजपनं सत्यजीत कदम यांना उमदेवारी दिली आहे. सत्यजीत कदम यांनी यापूर्वी कोल्हापूर महापालिकेत नगरसेवक म्हणून काम केलं आहे. तर, भाजपनं सत्यजित कदम आणि महेश जाधव यांचं नाव पाठवलं होतं. सत्यजीत कदम यांचं नाव फायनल व्हावं असं आमचं म्हणणं असून त्यावर आमचं एकमत झालं आहे. पण निर्णय रात्री दिल्लीच्या पार्लमेंटरी बोर्डात त्यावर निर्णय होईल, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे सत्यजित कदम यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती, अखेर त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.