Special Report | जिल्हा परिषद निकालानंतर भाजपचं शिवसेनेला अप्रत्यक्ष निमंत्रण?

Special Report | जिल्हा परिषद निकालानंतर भाजपचं शिवसेनेला अप्रत्यक्ष निमंत्रण?

| Updated on: Oct 07, 2021 | 9:11 PM

85 जिल्हा परिषद जागांपैकी भाजपने सर्वाधिक 23 जागा जिंकल्या. काँग्रेसनेही मुसंडी मारली. राष्ट्रवादीला बऱ्यापैकी यश मिळालं. मात्र राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही सेना तिसऱ्या क्रमाकांवर फेकली गेली. याच निकालावर अतिशय बोलकी फेसबुक पोस्ट लिहित भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना जागं करण्याचा प्रयत्न केला आहे.

जिल्हा परिषद पोटनिवडणुकीच्या निकालात महाविकास आघाडीने भाजपला जोरदार टक्कर दिली. झेडपी निकालात महाविकास आघाडी भाजपला वरचढ ठरली. 85 जागांपैकी 46 जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. परंतु चारही पक्षांमध्ये सर्वाधिक जागा मिळविण्यात भारतीय जनता पक्ष यशस्वी झाला. 85 जिल्हा परिषद जागांपैकी भाजपने सर्वाधिक 23 जागा जिंकल्या. काँग्रेसनेही मुसंडी मारली. राष्ट्रवादीला बऱ्यापैकी यश मिळालं. मात्र राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही सेना तिसऱ्या क्रमाकांवर फेकली गेली. याच निकालावर अतिशय बोलकी फेसबुक पोस्ट लिहित भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना जागं करण्याचा प्रयत्न केला आहे.

आमचा एकेकाळचा मित्रपक्ष शिवसेना जि.प. निवडणुकीत तिसऱ्या स्थानी गेल्याचं स्पष्ट झालंय. राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्या पक्षावर ही वेळ यावी? लोण्याचा गोळा कोण मटकावतंय, हे आता त्यांच्या लक्षात आलं असावं, असं सांगताना महाविकास आघाडीत शिवसेनेचं नुकसान होतंय, असंच एकप्रकारे चंद्रकांत पाटील यांना सांगायचंय. त्याच्याही पुढे जाऊन राष्ट्रवादी आणि काँग्रेस लोण्याचा गोळा मटकावतंय, असं सांगण्याचा चंद्रकांत पाटील यांनी प्रयत्न केलाय. तसंच उद्धव ठाकरे जनभावना लक्षात घेण्याइतके सुज्ञ नक्कीच आहेत, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.