Special Report | गेल्या दोन दिवसात भाजपच्या पाच नेत्यांकडून सेना-भाजप युतीचा सूर
आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रानंतर तर भाजप नेत्यांना एक प्रकारचा आशेचा किरण दिसत अशल्याचंच पाहायला मिळत आहे. सरनाईक हे सर्वसामान्य शिवसैनिकांची भाषा बोलत आहेत, बाकी निर्णय त्यांच्या पक्षप्रमुखांना अर्थात उद्धव ठाकरेंना घ्यायचा आहे, अशी वक्तव्ये भाजप नेत्यांकडून केली जात आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दिल्लीतील बैठकीनंतर राज्यातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजप नेत्यांकडून शिवसेनेसोबत सरकार स्थापनाबाबतची व्यक्तव्य केली जात आहेत. तर महाविकास आघाडीची घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे नेते आमचं सर्वकाही आलबेल सुरु असल्याचं सांगत आहेत. दुसरीकडे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रानंतर तर भाजप नेत्यांना एक प्रकारचा आशेचा किरण दिसत अशल्याचंच पाहायला मिळत आहे. सरनाईक हे सर्वसामान्य शिवसैनिकांची भाषा बोलत आहेत, बाकी निर्णय त्यांच्या पक्षप्रमुखांना अर्थात उद्धव ठाकरेंना घ्यायचा आहे, अशी वक्तव्ये भाजप नेत्यांकडून केली जात आहेत.
Latest Videos