Special Report | राऊतांच्या ‘गुलामगिरी’च्या विधानावरून शिवसेना-भाजप नेत्यांमध्ये वार-पलटवार
शिवसेनेला भाजपसोबत सत्तेत असूनही गुलामासारखी वागणूक मिळत होती, असा धक्कादायक दावा संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊतांच्या या आरोपाला आता माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर आणि पर्यायानं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर अत्यंत मोठा आणि गंभीर आरोप केलाय. पाच वर्षे आम्ही फडणवीस सरकारमध्ये होतो. पण शिवसेनेला भाजपसोबत सत्तेत असूनही गुलामासारखी वागणूक मिळत होती, असा धक्कादायक दावा संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊतांच्या या आरोपाला आता माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. खरं तर आपली बेईमानी झाकण्यासाठी गुलाम या शब्दाचा वापर केला जात असल्याचा पलटवार मुनगंटीवार यांनी केलाय.
Published on: Jun 12, 2021 10:01 PM
Latest Videos

शरद पवारांच्या आशीर्वादानं दादांच्या लाडक्या लेकांचा साखरपुडा संपन्न

'हे तर कलंक, या नालायकांनी...', वडेट्टीवारांचा मंगेशकर कुटुंबावर संताप

'आका' म्हणतो मला सोडा..वाल्मिक कराडचा निर्दोष मुक्ततेसाठी कोर्टात अर्ज

सुनील राऊतांना सिलेंडरची अंत्ययात्रा काढणं अन् हायवे रोखणं पडलं महागात
