Special Report | गोपीचंद पडळकरांच्या गंभीर आरोपावर राष्ट्रवादी आक्रमक

Special Report | गोपीचंद पडळकरांच्या गंभीर आरोपावर राष्ट्रवादी आक्रमक

| Updated on: Sep 08, 2021 | 10:42 PM

पुणे येथील वेल्हे याठिकाणी भाजप मेळाव्यात बोलत असताना पडळकरांनी शरद पवार यांच्यावर टीका केलीय. शरद पवारांना असा गृहमंत्री पाहिजे की जो पैसे गोळा करेल आणी पोटात राहील, रोज नोटा बारामतीला पोहोच करेल असा गृहमंत्री ते शोधतात. म्हणून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आपण सावधान राहा, असा सल्लाही गोपीचंद पडळकर यांनी गृहमंत्री वळसे पाटलांना दिला.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांसह पक्षावर चांगलाच निशाणा साधला आहे. त्यांनी गृहमंत्री वळसे पाटील यांनाही खोचक सल्ला दिला. पुणे येथील वेल्हे याठिकाणी भाजप मेळाव्यात बोलत असताना पडळकरांनी शरद पवार यांच्यावर टीका केलीय. शरद पवारांना असा गृहमंत्री पाहिजे की जो पैसे गोळा करेल आणी पोटात राहील, रोज नोटा बारामतीला पोहोच करेल असा गृहमंत्री ते शोधतात. म्हणून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आपण सावधान राहा, असा सल्लाही गोपीचंद पडळकर यांनी गृहमंत्री वळसे पाटलांना दिला.

त्याचबरोबर महाराष्ट्रात महाआघाडीचं सरकार स्थापन झालं आणि शरद पवारांनी पुतण्याला उपमुख्यमंत्री केलं. राष्ट्रवादीला नेहमी सत्तेत गृह मंत्रालय पाहिजे असतं. मग पवारांनी अनिल देशमुखांना शोधलं, त्यांचं कधी नाव ऐकलं होतं का? असा खोचक सवाल गोपीचंद पडळकर यांनी केला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही गोपीचंद पडळकर यांना प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. तुला फक्त पवार कुटुंबावर बोलण्यासाठी सोडलं आहे. मात्र, भारतीय जनता पार्टी तुझा सोयीचा वापर करुन तुला कधी मातीत घालेल याचा थांगपत्ताही लागणार नाही, असा टोला आमदार अमोल मिटकरी यांनी लगावला आहे.