Special Report | सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत मविआवर भाजपचा विजय
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत मोठं धुमशान रंगलं. महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये थेट लढत असल्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. त्यातच संतोष परब यांच्यावर हल्ला झाल्यानंतर या निवडणुकीला वेगळंच वळण लागलं. परब यांच्यावरील हल्ला प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांचं नाव आलं. त्यानंतर नितेश राणेंनी कोर्टात अंतरीम जामिनासाठी धाव घेतल्याने या निवडणुकीची रंजकता अधिकच वाढली.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत मोठं धुमशान रंगलं. महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये थेट लढत असल्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. त्यातच संतोष परब यांच्यावर हल्ला झाल्यानंतर या निवडणुकीला वेगळंच वळण लागलं. परब यांच्यावरील हल्ला प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांचं नाव आलं. त्यानंतर नितेश राणेंनी कोर्टात अंतरीम जामिनासाठी धाव घेतल्याने या निवडणुकीची रंजकता अधिकच वाढली. या सर्व नाट्यानंतरही बँकेवरील आपली सत्ता कायम राखण्यात केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी यश मिळविले आहे. या निवडणुकीच्या सहा वैशिष्ट्यांवर टाकलेली ही नजर.
ही निवडणूक भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी असली तरी ती राणे कुटुंब विरुद्ध शिवसेना अशीच होती. जिल्हा बँकेत भाजपला हरवणं म्हणजे राणेंच्या वर्चस्वला धक्का लावणं असं समीकरण होतं. त्यामुळे शिवसेना त्वेषाने या निवडणुकीत उतरली होती. पण तरीही राणेंनी 11 जागा जिंकत बँकेवर आपलंच वर्चस्व कायम असल्याचं दाखवून दिलं. तर महाविकास आघाडीने 8 जागा जिंकून मतदारांना आपल्याकडे खेचून आणण्यात यश मिळवलं आहे.